जिल्ह्यातील पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार

41

 

जिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांचे सभेत आश्वासन

चंद्रपूर(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात पशुसंवर्धन विभागातील
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत समस्याबाबत सभा घेण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी होत्या प्रमुख अतिथी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे होते. सर्वप्रथम पशुसंवर्धन विभागातील कर्मचारीच्या वतीने डॉ.मिताली सेठी यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. जिल्हातील पशुसंवर्धन।बाबत विविध उपक्रमाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशंसा केली.

यावेळी पशुचिकित्सा व कास्टट्राईब संघटनेची संयुक्त सभा घेण्यात आली पशुचिकित्सा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण भुसारी , कास्टट्राईब पशुसंवर्धन संघटनाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.बंडू आकनुरवार,जिल्हा सचिव डॉ. दिलीप भुसारी, डॉ. केतन भिवगडे यांनी कर्मचारीच्या वेतन, आश्वासित प्रगती योजनाचा पहिल।,दुसरा व तिसरा लाभ,6 व्या वेतन आयोगातील थकबाकी प्रवास भत्ता देयके ,निवृत्त कर्मचारीच्या थकबाकी व इतर समस्या निकाली काढन्याबाबत विनंती करण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी पशुसंवर्धन कर्मचारी च्या जिल्हा स्तरावरील समस्या लवकरच निकाली काढन्याबाबत आश्वासन देऊन सामान्य प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पशुसंवर्धन सेवा अधिक गतिमान व लोकांभिमुख करून पशुसंवर्धन।च्या विविध योजनांचा लाभ पशुपालकाना देण्याबाबत मार्गदर्शन केले. मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळ देऊन चर्चा केल्या बद्दल संघटनेच्या वतीने आभार डॉ. दिलीप भुसारी यांनी केले.