कामगारांच्या न्याय हक्कासाठी एकजुटीने लढणार – पालकमंत्री- विजय वडेट्टीवार

122

 

 

नकोडा येथे विजयक्रांती कामगार संघटनेचा मेळावा

 

चंद्रपूर : जिल्ह्यात कोळसा आणि सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात स्थायी – अस्थाई कामगार आहे. येथील कामगारांची दैनावस्था पाहवत नाही. त्यांना त्यांच्या हक्काचेसुध्दा मिळत नाही. मात्र त्यांच्या भरोश्यावर नफा कमवण्यात येतो. आतापर्यंत अनेक कामगार संघटनांचे अध्यक्ष केवळ कंपनी व्यवस्थपनाशी हात मिळवून कामगारांना वा-यावर सोडत होते. त्यामुळे कामगारांचे प्रश्न सुटले नाही. केवळ संघटनेचे अध्यक्ष आणि मुठभर सदस्य मालामाल झाले. मात्र मी असे होऊ देणार नाही. विजयक्रांती ही संघटना कामगारांसाठी बनवली आहे. कामगारांना सोबत घेऊनच व्यवस्थापनाशी बोलणी करण्यात येईल. फक्त कामगारांनो एकजुटीने राहा. तुमच्या सर्व न्याय हक्कासाठी सर्वांच्या सहकार्याने लढा देऊ, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन बहुजन कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. विजय वडेट्टीवार यांनी केले.

घुग्घुस येथे नकोडा गावात शिवानीताई वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली विजयक्रांती कामगार संघटनेची स्थापना आणि कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कामगारांची उपस्थिती होती. मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले, नकोडा गावात आज ऐतिहासिक मेळावा कामगारांनी केला आहे. या कार्यक्रमातून भविष्याची वाटचाल ठरणार आहे. कामागारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मी विजय वडेट्टीवार नेहमी तुमच्या पाठीशी आहे. इतर संघटनासारखी ही कामगार संघटना नाही. कंत्राटी कामगारासाठी कोणी लढत नाही. शिवानीला म्हटले, यांच्यासाठी काम कर. हे कामगार नेहमी तुला लक्षात ठेवतील. आतापर्यंत संघटनांचे प्रतिनिधी माल खावून गब्बर झाले, मात्र कामगार उपेक्षितच राहिला.

आमची संघटना उद्योगांना वेठीस धरण्यासाठी बनविली नाही. जिल्ह्यात उद्योग आले पाहिजे. कामगारांच्या भरोश्यावर उद्योगांना मिळणा-या नफ्यातून हक्काचे कामगारांनाही मिळाले पाहिजे. सरकारच्या स्तरावर कामगारांचे जे प्रश्न बाकी आहे, ते मी नक्कीच सोडविणार. संपूर्ण कामगारांनी एकजुटीने राहा. कोणाच्याही बहकाव्यात येऊ नका. तुम्हाला काही लोक फूस लावण्याचा प्रयत्न करतील. मात्र एकजुट राहिली तर आठ दिवसात सर्व प्रश्न सोडविण्याची ताकद आपल्यात आहे, हे लक्षात ठेवा, असे विजयभाऊ गरजले.

सिमेंटच्या ताकदीवरच जगात मोठमोठे प्रकल्प, पायाभुत सुविधा निर्माण होत असतात. विकासाचा पाया सिमेंटमुळेच उभा राहतो. मात्र या कंपनीत काम करणारा स्थायी आणि अस्थाई कामगार हलाकिचे जीवन जगतात, हे मला माहिती आहे. सिमेंट उद्योगात काम करणा-या कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो. ते मी मिळवून देणारच आहे. कामगारांनो विश्वास ठेवा, ही संघटना तुमच्यासाठी, तुमच्या हक्कासाठी निर्माण केली आहे.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शिवानीताई वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रकाश देवतळे, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष ॲङ राम मेश्राम, विजय ठाकरे अध्यक्ष विजतक्रांती कामगार संघटना यांचे मार्गदर्शन झाले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण लांडगे कार्याध्यक्ष विजक्रांती कामगार संघटना, सतीश शेंडे, राजेश यनगलवर, नितीन पटेल, किरण पुरेली, रमेश रुद्रारूपा, राजेश बावणे यांच्यासह पदाधिकारी यानी मेहनत घेतली .