
मतदारांना जागृत करण्याकरिता व १८वर्षे पूर्णं झालेल्या नविन मतदारांची नाव नोंदणी करण्याकरिता सावली शहरात रॅली काढण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली द्वारा कला शाखा अंतर्गत मतदार जागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला यशस्वी करण्यासाठी सावली तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सागर कांबळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली हे अतिथी म्हणून उपस्थित होते. या रॅलीला यशस्वी करण्यासाठी कला शाखेतील प्रा. खोबरागडे प्रा.वासाडे प्रा.सौ.भाकरे प्रा.वासेकर प्रा.कु.खोब्रागडे प्रा सुकारे व इतर सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.