निस्वार्थ सेवा करणारे स्वच्छता मित्रा..

109

 

गेल्या तीन वर्षापासून बाराही महिने वाहत असलेला धबधबा निरंतर वाहत राहावा यासाठी स्वच्छता मित्रा भर उन्हाळ्यात धबधब्याची स्वच्छता करून पाण्याची वाट मोकळी करून पाणी बाराही महिने वाहत राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात, तीन वर्षात नंतरही उन्हाळ्यामध्ये पाणी निरंतर वाहत आहे,

स्वच्छता मित्रा व शोध विचार वेध संस्था ,सोमनाथ मंदिर परिसरातील दारू बाटली, बिसलरी, प्लास्टिक वेफर्स, दारूचे ग्लास, उचलण्याचे काम स्वच्छतामित्र करीत आहे.आपलासा वाटणारा सोमनाथ पर्यटकासाठी स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

मुल वरुण अवघ्या बारा किलोमीटरवर असलेलं शंभर वर्ष पुरातन शिवमंदिर निसर्गाने नटलेल पक्षी, प्राणी, शेत, डोंगर निसर्गाची शुद्ध हवा असलेल्या मंदिर.

स्वच्छता मित्रा दर रविवार व बुधवारला परिसरातील स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश पर्यटकाला देत असतात. परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी कचराकुंड्या लावण्यात आले आहे लागणारं साहित्य जनसामान्यांना मेसेज टाकून दान स्वरूपात मागून वस्तू वापरण्यात येतात याचा फायदा स्वच्छतेसाठी होत आहे.

आपल्या जन्मभूमी ची सदैव आठवण राहण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासनारे गौरव गोपीचंद शामकुले निस्वार्थ सेवा करीत असतात. सोमनाथ (आमटे फार्म )हे त्यांचे जन्मगाव स्वर्गीय बाबांच्या सहवासात राहून सामाजिक कार्याचे धडे आत्मसात करून समाजसेवेची पाऊल सातत्याने चालू आहे, बालपण कुष्ठरोग यामध्येच गेलं कुठल्या गोष्टीची भीती न बाळगता लहानाचा मोठा त्यांच्या सहवासात राहूनच मोठे झालेले गौरव शामकुले सातत्याने अविरत निस्वार्थ सेवा आजही करीत आहे . युवकांचे युथ आयकॉन या नावाने ओळखले जातात. विविध प्रश्नावर उत्तर शोधून तोडगा काढणे व आंदोलन करणे हे विशेष.

स्वच्छ्ता मित्रा…. अभियानात प्रतीक मुरकुटे, बबलू गेडाम, स्वप्निल आकेवार, निलेश गावतुरे अल्लाद मोघरे, लखन गिरडकर, अंकुश वाढई, ई.