उमरी पोतदार येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

39

 

दि.२०/४/२०२२ ला जि.प.उ.प्राथमिक,शाळा उमरी पोतदार येथे शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.याप्रसंगी गावचे सरपंच मान, सौ ठामेश्वरी लेनगुरे, शाळा व्य. समिती अध्यक्ष मान. श्री धनराज मेश्राम,सर्व शा. व्य. स.पदाधिकारी तसेच दाखल पात्र विद्यार्थी व त्यांचे पालक,गावातील इतर उत्साही संघटनांचे पदाधिकारी, तरुण युवक युवती,शिक्षण प्रेमी तरुण – तरुणी निघालेल्या पूर्व तयारीच्या दिंडीला उपस्थित होते.
दिंडी आटोपून शाळेत आल्यावर दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, औषवन करून स्वागत करण्यात आले.

सर्व सातही स्टॉलवर दाखलपात्र सर्वच विध्यार्थ्यांनी आपापल्यापरीने अधिकाधिक उत्साह दाखवत प्रतिसाद दिला,पालकांनीही सर्व सातही स्टॉल बाबत माहीती जाणून घरी सर्व अभ्यास आम्ही मुलांकडून करून घेऊच याची ग्वाही दिली.सदर कार्यक्रमात सर्वच शिक्षकांनी भरपूर मेहनत घेऊन हा कार्यक्रम पाहुण्यांच्या मनात घर करण्यासारखा केला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदम सर यांनी तर कार्यक्रमाचे संचलन श्री गव्हारे सर यांनी केले,आभार प्रदर्शन श्री कोवे यांनी मानले,श्री.टोंगे सर,श्री.कावरे सर यानी चोख व्यवस्था ठेवली,सरतेशेवटी मसाला भात-जिलेबी-मठ्ठाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.