राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने पुण्य नगरीचे संजय पडोळे सन्मानित

48

नाशिक येथे पार पडला पुरस्कार सोहळा

चंद्रपूर :- मूल येथील दै. पुण्य नगरीचे प्रतिनिधी, तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष आणि सचिव आणि सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अग्रणी कार्यकर्ते संजय पडोळे यांना यावर्षीच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मागील बावीस वर्षापासुन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुंबई येथिल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे नाशिक येथील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामूळे मागील दोन वर्षापासुन होऊ न शकलेला राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, सहिष्णुता, पञकारीतेतील योगदान आणि गुणवत्ता या त्रिसुत्रीच्या आधारे जेष्ट पत्रकार संजय पडोळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अनेक दशकांपासून संजय पडोळे पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. सामाजिक बांधलकी जोपासून त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे. त्याचबरोबर येथील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य अमूल्य आहे. या क्षेत्रात ते नेहमिच अग्रेसर असतात. मूल येथील श्री मॉ दुर्गा मंदिर देवस्थानचे सचिव आणि कलानिकेत या सांस्कृतिक संस्थेचे संचालक असलेले संजय पडोळे सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविदयालयात मुख्य लिपिक पदावर सेवारत आहेत.

नाशिक शहरातील सांस्कृतिक सभागृहात निवृत्त पोलीस अधिकारी तथा साहित्यिक रामभाऊ आव्हाड, महापरिषदेचे समन्वयक कृष्णा जगदाळे, पत्रकार प्रकाश सावंत, समन्वयक एल.एस.दाते आणि समारंभाध्यक्ष तथा शिक्षणतज्ज्ञ मनिषा कदम, नाशिक सुंदरी मनिषा बेलाटी यांच्या हस्ते संजय पडोळे यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक आणि महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबददल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.