
आजादी का अंमृत महोत्सव निमित्याने आरोग्य विभागाच्या वतीने बुधवार दि. २७ एप्रिल २०२२ ला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत भव्य आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

दुर्धर आजारी, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, दबा, कुपोषित बालके, हायड्रोसील, हर्निया, कान, नाक व घसा तपासणी, दंत्त तपासणी, गार्भषयाचे आजार, स्त्रीरोग संबधीचे आजार (गर्भशयाचे स्तनाच्या गाठी ) कोविड झालेल्या रुग्णाची तपासणी, मोती बिंदू तपासणी व उपचार, गुप्तरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, हिवताप, हत्तीरोग, डेंगू इ. आजारावर तज्ञांमार्फत तपासणी, रक्त लाघवी, सिकलसेल, एच.आय.व्ही, महाल्याब अंतर्गत ३६ प्रकारच्या तपासण्या,
एक्सरे, सोनोग्राफी, कर्करोग, इत्यादी मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या सहकार्यातून जानेवारीत झालेल्या अपंग शिबिरातील प्रमाणपत्र तसेच अपंगांना ट्रायसायकल वितरीत करण्यात येणार आहे.तरी सर्व गरजू रुग्णांनी उपकेंद्र स्थळावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडे नोंदणी करण्यात यावी व रुग्णांनी येतांना आधार कार्ड / pan कार्ड / राशन कार्ड / वाहन परवाना / link mobile आणावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय सावली,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,स्वास्थ केंद्र जीबगाव,लोंढोली, व्याहड,बोथली,पाथरी, अंतरगाव यांनी केले आहे.