वादळी पावसात वीज कोसळून 20 बकऱ्या ठार; पशुपालक सुदैवाने बचावला

32

वादळी पावसात वीज कोसळून 20 बकऱ्या ठार;
पशुपालक सुदैवाने बचावला

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मागील पंधरवड्यापासून उकाड्याने नागरिक हैराण असतानाच आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक वादळी पाऊस आला ढगात विजेचा कडकडाट होऊन बकऱ्याचा कळपावर वीज कोसडली आणि 20 बकरी त्यात ठार झाले तर नशीब बलवत्तर म्हणून पशुपालक थोडक्यात बचावला,,ही घटना आज सायंकाळी राजुरा तालुक्यातील सोंडो या गावी घडली आहे.

सोंडो येथील वासुदेव जिटापेन्नवार हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव बकऱ्या चरायला शेत शिवारात गेला होता परंतु घरी परत येण्याच्या वेळेतच आकाश भरून आले विजेचा गडगडाट सुरू झाला आणि अचानक बकऱ्याचा कळपावर वीज कोसळली आणि पशुपालकासमोरच एक क्षणात 20 बकऱ्या या अपघातात ठार झाले दरम्यान नशीब बलवत्तर म्हणून पशुपालक बचावला आहे


घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी लोकांचा जमाव झाला महसूल व पोलीस विभागाला स्थानिक पोलीस पाटलांनी याची माहीती दिली
दरम्यान या घटनेत त्या गरीब पशुपालकाची अडीच लाख रुपयांची नुकसान झाली असून तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी पंचायत समिती माजी उपसभापती मंगेश गुरनुले यांनी महसूल अधिकाऱयांना केली आहे