सावली येथील जिप शाळेत पूर्व तयारी मेळावा संपन्न

38

 

 

दि.19/04/2022 रोज मंगळवार ला जि प उच्च श्रेणी शाळा, सावली येथे समग्र शिक्षा तथा शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तर्फे शाळापूर्व तयारी मेळावा 1 आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथक व लेझीम नृत्य सादरीकरण व घोषवाक्याच्या गर्जनेत प्रभातफेरी काढून करण्यात आली.

भरतीपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक समस्त शा. व्य. समिती, अंगणवाडी सेविका,आशावर्कर, व शिक्षक वृद सहभागी झाले.कार्यक्रमाचे उदघाटन प्रकाश लोनबले अध्यक्ष शा. व्य. समिती यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नितेश रस्से सदस्य नगरपंचायत सावली यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून उमाकांत वाढई,योगिता निकोडे, तृप्ती मुळेवार, शामकला पेंदोर तथा समस्त शा. व्य. समिती सदस्यगण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली केंद्राचे केंद्रप्रमुख वासुदेव आत्राम यांनी सादर केले. मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर स्टॉल वरील साहित्या व्दारे भरतीपात्र विद्यार्थ्यांकडून विविध कृती करून घेण्यात आल्या.कार्यक्रमाचे संचालन गोंगले व आभार प्रदर्शन रामटेके केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती संतोषवार तथा शिक्षक वृद तोटावार , ताडकोंडावर,कुंभरे व नंदनवार यांनी विशेष परिश्रम घेतले.