
सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द आज सकाळी 10 च्या सुमारास दोन युवक आपसात बोलत असतानाच त्यांचे रूपांतर भांडणात झाले त्यावरून एक युवक जखमी असून सावली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की वैभव भक्तप्रल्हाद नापे- वय 20 वर्ष रा.किसान नगर व सुमित उर्फ हनीसिंग टेकाम रा व्याहड व इत्तर एक जण असे व्याहड खुर्द येथे उमेश कन्नाके यांच्या हॉटेल समोर बोलत असतांनाच बोलण्यातून भांडण झाले त्यावरून मारहाण झाली.त्या ठिकानी वैभव नापे या युवकाला सुमित व सोबतीच्या एक युवकांनी जोरदार मारहाण करून त्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला.वैभव हा वार हुकविला मात्र चाकू चा टोक गळ्याला चिरा करीत गेली त्यांनतर तेथे कढई तील गरम तेलच त्या वैभव च्या अंगावर टाकले त्यावेळी तो हाताला पूर्णतः भाजला गेला.
मारहाण करून दोन्ही युवक पळून गेलेले आहे.जखमी झालेला वैभव नापे याला प्राथमिक उपचार करून सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे.त्याच्यावर उपचार सुरू आहे.या संदर्भात सावली पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे.
