
सावली तालुक्यातील
कापसी येथे दि. 27/03/2022 रोजी झालेल्या सेवा सहकारी संस्था कापसी व्यवस्थापक कमिटीची निवडणूक झालेली होती यात भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी परिवर्तन पॅनलला बहुमत मिळाले असून विजयी झालेला होता.

यात संतोष तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती जि. चंद्रपूर व सचिन तंगडपल्लीवार संचालक बाजार समिती सावली तथा माजी प्र. सरपंच तथा सदस्य ग्राम पंचायत कापसी यांच्या नेतृत्वाखाली दि. 20/04/2022 सर्व शेतकरी ग्रामवासीय शांततेपणे कापसी येथील सेवा सह. संस्थेवर अध्यक्ष म्हणून रमेश चलाख व उपाध्यक्ष रमेश हुलके यांची निवड करण्यात आलेली असून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यात सदस्य प्रदीप कान्हूजी चलाख,पुरुषोत्तम शेडमाके, नीलकंठ बारसागडे,पैकूजी साखरे, रामराव भांडेकर, विलास बुरले,पत्रुजी परचाके,बाळकृष्ण पिपरे, शालीक वासेकर, पर्वताबाई चापडे, व अनेक ग्रामवासीय उपस्थित होते.
