आंदोलनाचा इशारा देताच चीचबोडी फाट्यावर 6 तासात लागले गतिरोधक

117

 

🔶 कांग्रेस युवा नेते निखिल सुरमवार यांचा इशारा चा प्रशासनाने घेतला धसका

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द ते मुडझा या चीचबोडी चौकातील रस्त्यावर गतिरोधक लावावे अशी मागणी कांग्रेस चे युवा नेते निखिल सुरमवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावली व राष्ट्रीय महामार्ग अभियंता गडचिरोली यांना केली होती अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला.याचा प्रशासनाने धसका घेत अवघ्या 6 तासात यंत्रणा कामी लागून चीचबोडी फाट्यावर गतिरोधक लावल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

व्याहड ते मुडझा हा मार्ग नेहमीच वर्दळीचा मार्ग असून त्या ठिकाणाहून अनेक वाहने ही चालत असतात.याच रस्त्याला लागून चंद्रपूर-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग आहे.त्या ठिकाण चे रस्ते सिमेंटीकरण करण्यात आले.तसेच गोसेखुर्द चे पूल ची निर्मिती करण्यात आली.मात्र त्याच्या कठड्याची उंची मोठी असल्याने चीचबोडी कडून येणाऱ्या रस्त्यावरून कोण येत हे दिसत नसल्याने अपघाताची मालिका सुरू आहे.

याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने अनेक जण जखमी सोबतच काही जणांना प्राणही गमवावा लागला होता.त्यामुळे चीचबोडी कडील रस्तावर व व्याहाड खुर्द फाट्यावर आठ दिवसात गतिरोधक लावावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा कांग्रेस युवा नेता निखिल सुरमवार यांनी दिला.

व प्रशासना सोबत दूरध्वनी वर संपर्क साधून दुर्लक्ष करू नका असा इशारा दिला.त्या वरून प्रशासनाने आज चीचबोडी टी पाइंट वर गतिरोधक ची निर्मिती केली आहे .या वेळी स्वतः त्याठिकाणी कांग्रेस युवा नेता निखिल सुरमवार,दिपक जवादे , केशव भरडकर, राजु टोंगे,देवेंद्र टोंगे,भास्कर मस्के उपस्तीत होते.