
हरांबा प्रतिनिधि
( मोहित मुद्दमवार)
सावली तालुक्यातील हरांबा गावामध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा हरांबा येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. मेळावा आयोजित करण्या मागे एकच उद्देश होता की दोन वर्षाच्या कोरोना च्या काळात अंगणवाडी बंद असल्या मुळे लहान मुलांच्या शैक्षणिक विकासात खंड पडला. त्या साठी महाराष्ट्र शासनाद्वारे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करून लहान मुलांचा बौद्धिक व शारिरीक विकास व्हावा त्या साठी हि मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्या कार्यक्रमाला उपस्थित गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष , सचिव व तंटामुक्ती अध्यक्ष, व गावकरी मंडळी तसेच , पालक वर्ग, सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका तसेच मॅजिक बस फाऊंडेशन चे ( cc) विकी चौधरी सहकार्य साठी उपस्थित होते. कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.

