विरुर स्टेशन येथे प्रवाश्यासाठी थंड पाण्याची पाणपोई

46

विरुर स्टेशन(तिरुपती नल्लाला)-
विरुर स्टेशन येथील व्यवसायिक पंकज चंद्रकांत उपलचीवार यांनी सामाजिक दायित्वातून उन्हाळ्यात प्रवाश्याची पाणी पिण्यासाठी लाहीलाही होऊ नये म्हणून गावातील बस थांबा चौक व डोंगरगाव फाटा या दोन ठिकाणी थंड पाण्याचे पाणपोई सुरू केली आहे मागील दोन वर्षांपासून त्याचा हा प्रशंसनीय उपक्रम सुरू आहे या पाणपोई मुळे लहान मोठे सर्व प्रवाश्याना मोठा दिलासा मिळत आहे
त्यांच्या या उपक्रमाबद्दल प्रवाशाकडून आभार मानले जात आहे