
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान मंदिर कॅम्प एरिया गडचिरोली येथे हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी हनुमान मूर्तीचे दही दुधाने अभिषेक करून पूजा करण्यात आले . दुपारी भजनाचा व काल्याचा कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी आरमोरी येथील जागरण हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.व रात्रौ महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रात्री जागरण व भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी पुरुष मंडळी व महिला मंडळींनी जोरदार नृत्य करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हनुमान उत्सव समितीच्या भक्तांनी अतिशय मेहनत घेतली. यामध्ये महिला मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

