चॅम्पियन्स ऑफ इंडिया रन स्पर्धेत 10 किमीचे अंतर राष्ट्रीय धावपटू साईश्वर व श्रद्धा गुंटूकने कमी वेळात केला पूर्ण

128

 

चॅम्पियन फिटनेस (जयपूर) यांच्या तर्फे आयोजित चॅम्पियन्स ऑफ इंडिया या रनिंग स्पर्धेत राष्ट्रीय धावपटू साईश्वर केशव गुंटूक व श्रद्धा केशव गुंटूक या बहीण भावाने 10 किमी अंतर रनिंग करून पुन्हा एकदा आपले कर्तृत्व दाखविण्याचा प्रयत्न केले आहे. साईश्वरने 10 किमी अंतर कमीतकमी वेळात म्हणजे 40 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण करून सर्वांना चकित केले आहे. तर तेवढेच अंतर श्रद्धा हिने 50 मिनिटे 3 सेकंदात पूर्ण केले आहे. ही स्पर्धा सिंहगड कॉलेज येथे पूर्ण करण्यात आले.

हे आजपर्यंतच्या म्हणजेच 4 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात कमी वेळात पूर्ण केले आहे. ही स्पर्धा अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन व फिटनेस अँड वेलनेस ट्रेंनरचे संस्थापक प्रशांत बट्टर व संयोजिका डॉ. सरिता चौधरी यानी या रेसचे आयोजन केले होते. रामचंद्र सर यांच्याकडून साईश्वर व श्रद्धा गुंटूक यास मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या रनिंग स्पर्धेत भारतामधील विविध राज्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

आपल्या अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हा प्रवास गेल्या तीन वर्षांपासून अखंड चालू ठेवत आपली अनोखी छाप उमटवून पुन्हा एकदा सोलापूर व महाराष्ट्र राज्याचा नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. कमी वयातला जास्तीत जास्त धावण्याच्या स्पर्धेत विक्रम नोंदविणारा खेळाडू म्हणून त्याचे क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे. जून महिन्यात गुजरात येथे होणाऱ्या युथ गेम्स स्टेट चॅम्पियनशिप 2022 मध्ये साईश्वर व श्रद्धा यांनी सहभाग नोंदवणार आहेत. सध्याच्या काळात शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातील कला गुणांना चांगले वाव मिळत आहे.

या संधीचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूनी घेऊन जगाच्या नकाशावर भारताचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले जावे यासाठी प्रयत्नरत असताना सोलापूरच्या छोट्या धावपटू साईश्वरनेही आपल्या बहिणीसोबत ध्येय गाठण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अथक परिश्रम घेत आहे. यासाठी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे व सिनियर Olympion व मॅक्सफिटचे संस्थापक पराग पाटील (Mumbai) तसेच स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.