
तोहोगाव,प्रतिनिधी-

तोहोगाव सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली यात 11 कांग्रेस आणि इतर दोन सदस्य निवडून आले आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवडणूक झाली यात अध्यक्ष पदी नीलकंठ रागीट तर उपाध्यक्षपदी बाबुराव झाडे यांची निवड झाली आहे.
तोहोगाव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस नि आपल्या बळावर13 उमेदवार उभे केले होते तर भाजपा ने वंचित बहुजन आघाडी व शेतकरी संघटने बरोबर युती करून 13 उमेदवार उभे केले होते परंतु कर्जदार सभासदांनि काँग्रेस च्या बाजूनी कौल देत काँग्रेस चे 13 पैकी 11 उमेदवार विजयी झाले होते या मध्ये नीलकंठ रागीट,बाबुराव झाडे,संतोष साळवे,मंगेश शेतकी,संजय सातपुते,सुनील वाघडे,संजय बोपनवार,महेंद्र दुर्गे,बाळा शेंडे,सुनंदा महाजन,छाया मोरे,सर्व काँग्रेस तर युतीचे बंडू धोटे,कृष्णा निखाडे निवडून आले होते.सदर निवडणूक 27 मार्च ला झाली होती
काँग्रेस चे संचालक निवडून आणण्यासाठी सर्व संचालक सह फिरोज पठाण,प्रवीण मोरे,शरदचंद्र महाजन यांनी अथक परिश्रम घेतले होते
