मोहफूल वेचण्यासाठी गेलेला व अंगणात झोपलेल्या इसमावर वाघाच्या हल्ला;2 ठार

102

 

 

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथे अंगणात झोपलेल्या शालीक बुधा ननावरे वय 70 वर्ष यांच्या वर मध्य रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केले या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा दुसरी घटना उजेडात आली आहे.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही उपवनक्षेत्र पवनपार गावातील इसम सकाळच्या सुमारास मोहफूल वेचण्यासाठी गेला असता जंगल परिसरात धरून असलेल्या वाघाने इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना उजेडात आली.

मृतक इसमाचे नाव सुरेश रामू लोनबले (५०) असे आहे.सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी हाेत आहे.