काम्प्लेक्स जवळ अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने स्कुटी वरील पती पत्नींला उडविले

44

 

गडचिरोली जिल्ह्यात नवेगाव मुरखडा ग्रामपंचायत सरपंच दशरथ चांदेकर हे पत्नी कल्पना सोबत स्कुटीने कोटगल रोडने काम्प्लेक्स कडे येत असताना कोर्टाजवळ काम्प्लेक्स येथे एका अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिली.

त्यात कल्पना दशरथ चांदेकर घटनास्थळी ठार झालेत तर सरपंच दशरथ चांदेकर हे जखमी झालेले असून ते सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.भरधाव धडक देणाऱ्या चारचाकी ही घटनास्थळाहुन फरार झालेली असून पोलीस शोध घेत आहे.

प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात येत आहे.कल्पना चांदेकर यांच्या अपघाती निधनानंतर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र दुःख व्यक्त केल्या जात आहे.
व्याहड बूज येथील संजय चांदेकर यांचे जखमी सरपंच दशरथ हे मोठे बंधू आहेत.