Home
Homeमहाराष्ट्रगृहिणींसाठी लोणचे तयार करण्याचे स्पर्धा

गृहिणींसाठी लोणचे तयार करण्याचे स्पर्धा

 

सोलापूर : सध्याच्या जमान्यात अनेक युवकांना ‘लोणचं’ खायचे म्हटले तर, अक्षरशः जीवावर येते. मुलींना आणि युवतींना ‘लोणचं’ खाणं म्हणजे जीव की प्राण असेच वाटते. आजही तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतात विविध प्रकारच्या लोणचे तयार करुन चवीने खातात.

खानावळीतसुध्दा (हॉटेलमध्ये) हमखास वाढले जाते. तसेच तेलंगणा राज्य आणि इतर राज्यातील ग्रामीण भागात तर प्रत्येक कुटुंबाच्या घरात किमान चार ते पाच प्रकाराच्या लोणचे वर्षभर पुरेल इतका साठा उपलब्ध करून ठेवतात. कधीकधी भाजी नसले तर, लोणच्यासोबत आवडीने खातात. पूर्वीच्या महिला तर लोणचे तयार करण्यात हातखंडा होता आणि आहे. सध्या विविध प्रकारच्या लोणचे रेडिमेड मिळण्याची सुविधा व्यवसायिकांनी बाजारात उपलब्ध करुन ठेवले आहेत.

गृहिणींना लोणचं तयार करण्याची आवड निर्माण झाले पाहिजे. या उद्देशाने अनोखा उपक्रम राबविण्या-या सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने हिंदू नववर्षाचे औचित्य साधून गृहिणींसाठी लोणचं (शाकाहारी) तयार करण्याचे स्पर्धेचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक श्री व्यंकटेश्वर देवस्थानम (पूर्व विभाग – दाजीपेठ) हे आहेत अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.

ही स्पर्धा शनिवार , दि. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक (शार्प) ५.०० वाजता असून गृहींणींनी घरीच स्वतः तयार करुन आणलेल्या लोणचं सोलापूर शहराच्या पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर बहुद्देशीय मंगल कार्यालय या ठिकाणी आणाव्यात.

प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम ३००१ /- (तीन हजार रुपये रोख) आणि प्रमाणपत्र “अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूल” संस्थापक श्री. अजय पोन्नम (सर) पुरस्कृत आहेत.
द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम २००१ /- (दोन हजार रुपये रोख) आणि प्रमाणपत्र “फ्रोजन फूड मॉल” श्रीनिवास बोनाकृती हे पुरस्कृत आहेत

तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम
१००१ /- (एक हजार रुपये रोख)आणि प्रमाणपत्र अजय म्याना, उपव्यवस्थापक, महावितरण, अहमदनगर हे पुरस्कृत आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अनुक्रमे रुपये पाचशे – पाचशे रोख आणि प्रमाणपत्र कंदीकटला डाईंग वर्क्स रघुरामुलू कंदीकटला हे पुरस्कृत आहेत.
सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी.

अधिक नियम पुढीलप्रमाणे
१ गृहिणींनी स्वतः लोणचं घरीच तयार करुन आणायचे आहेत.
२ लोणचं एका भांड्यात (प्लॅस्टिक बाउलमध्ये) ठेवून सजावट करायचे.
3 लोणचं तयार केल्याचे तपशीलवार (रेसिपी – साहित्य – कृती) माहिती देणे बंधनकारक. (कागदावर)
४ एका स्पर्धक (गृहीणीला) एकाच प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होता येईल.
५ अनेकांनी एकाच प्रकारच्या लोणचे तयार करुन आणले तर, त्याबाबत परिक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. सर्वांना बंधनकारक राहील.

६ लोणचे विविध प्रकारात
तयार केले तर, चालतील.
७ स्पर्धकाने लोणचं घरीच स्वतः तयार करुन आणणे. (किमान १०० ग्रॅम) बाजारातून आणलेले लोणचं स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल.
८ सहभागी स्पर्धक हे ‘सोलापूर शहरातील’ असणे आणि ‘आधारकार्ड’ जवळ बाळगणे बंधनकारक आहे.
९ अन्य शहरातील महिला ‘सोलापूर शहरातील गृहिणींना’ सहकार्य करु शकतात. परंतु स्पर्धेच्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध असेल.
१० वयाची अट – किमान ‘२० ते ५५’ वयापर्यंत असलेल्यांनाच सहभागी होता येईल.
११ सर्वच समाजातील गृहिणींना संधी.

१२ स्वाद, रुचकर, पौष्टिक, आरोग्यदायी, मांडणी आणि सजावट यावरही गुण दिले जातील, स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

१३ ही स्पर्धा फक्त महिलांसाठीच आहे.
१४. स्पर्धा प्रवेश फी २०/-रुपये.
१५ परिक्षकांचा अंतिम निर्णय राहील.
१६. अधिक माहितीसाठी संपर्क : 9021551431
या स्पर्धेत जास्तीत जास्त गृहीणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, लक्ष्मण दोंतूल, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, अंबादास आधेली, गोविंद केंची, बालाजी कुंटला, प्रा. अनुप अल्ले, नवनीत पोला यांनी केले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !