Home
Homeमहाराष्ट्रहरणघाट येथील श्री मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर येथे उत्सव सप्ताह...

हरणघाट येथील श्री मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर येथे उत्सव सप्ताह साजरा

 

सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील श्री मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर हरणघाट हे प्रसिद्ध धाम असून या ठिकानी रामनवमी ते हनुमान जयंती पर्यन्त चा सप्ताह संपन्न झाला त्यात हजारो भक्त सहभागी झाले होते.

 

कोरोना काळ सोडला तर दरवर्षी राम नवमी आणि हनुमान जयंती निमित्त श्री मुर्लीधर स्वामी महाराज हरणघाटयांच्या कृपा आशीर्वादाने आणि प्रभू श्री हनुमान जी च्या कृपेनेअनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येते.

नियमित च्या वर्षा प्रमाणे यंदाही रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त सात दिवसीय दिनांक १०ते१६या तारखेपर्यंत ऊतस्व सप्ताह पार पाडण्यात आले.

या सात दिवसीय सप्ताह मध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले पहिल्या दिवशी घट स्थापना श्री मुर्लीधर स्वामी कार्तिक महाराज यांचे आई -वडीला च्या उपस्थित,कलश यात्रा,राम दरबारअभिषेक पूजन,श्री राम आणि सीता मया विवाह सोहळा,भोजन,शोभ यात्रा,महाप्रसाद ,किर्तन आणि रात्रौ गुरुदेव सेवा मंडळ चांदापूर येथील भजन करण्यात आले.

 

दुसऱ्या दिवशी तुलशी रामकथेवर विश्लेषण श्री मानकर गुरुजी हिंघणघाट यांनी केले अशा प्रकारे नियमित सात दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि या कार्यक्रमाला भक्त गणांच्या हजेरीने श्री मुर्लीधर धाम मंदिर गजबजून गेले.

या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आमदार डॉक्टर देवराव होळी, पारडी गावातील सरपंच बंडू मेश्राम,पारस नागापुरे उपसरपंच पारडी,ग्रामपंचायत सद्यश गण,गावातील जनता

आणि श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान देवटोक येथील कमिटी व या कार्यक्रमाला देवस्थान कार्यकारी मंडळचे अध्यक्ष श्री संत मुर्लीधर महाराज,उपाध्यक्ष लछय्याजी गदेवार ,सचिव सुभाष नागुलवार,सह सचिव नरेंद्र जकुलवार ,कोषाध्यक्ष मुकेश गुरुनूलेआणि देवस्थान समितीचे सदस्य गण उपस्थित होते.

श्री हनुमान जयंतीच्या दिवशी समारोपी य कार्यक्रम घेऊन महाप्रसाद आणि भोजन दान सर्व भाविक भक्तांना देण्यात आले तसेच गरीब व गरजू महिलाना वस्त्र दान आणि सायकल चे वाटप श्री मुर्लीधर महाराज हरणघाट यांचे हस्ते करण्यात आले आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !