
राजुरा तालुक्यातील विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोंडो येथे दुचाकी व ट्रक च्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे.

आकाश मारोती ढोले वय 14 वर्ष रा सोनुर्ली व नागोबा आदे असे दोघ मिळुन MH 34 BT 5407 ने सोंन्डो येथे मोटार सायकलने डब्बल सिट जात असतांना सोन्डा गावाजवळ हायवे वरुन समोरुन विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र MH 34AV 6186 च्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवुन अपघात घडवुन आणला.
व त्यामुळे नागोबा आदे हे गंभीर जखमी झाले तर मागे बसलेला आकाश ढोले हा जागीच मरण पावला. सदर गुन्हा विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला असून नोंद करून आरोपी ला त्याब्यात घेतलेले आहे.