
चंद्रपूर : – ( गांधी बोरकर )

वरोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिंदोडा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ग्राम स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी वरोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आर. व्ही. राठोड यांचे हस्ते ग्राम स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत जामगांव ( बु ) सरपंच गुणवंत ठेंगणे तर प्रमुख पाहुणे वरोरा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी. व्ही. चहारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर अभियानात गावातील भजन मंडळ, युवक मंडळ, महिला बचत गट, प्रतिष्ठीत नागरिक तथा सर्व गावकरी मंडळी यांनी प्रभातफेरीत उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी उपस्थितांना संवर्ग विकास अधिकारी आर. व्ही. राठोड आणि शिक्षण विस्तार अधिकारी डी. व्ही. चहारे यांनी ग्राम स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभागी होऊन ग्रामस्थांना स्वच्छता अभियानाचे महत्त्व विस्तृतपणे विशद करून विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी. टी. वाकडे, सरपंच गुणवंत ठेंगणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव तुराणकर, अंगणवाडी सेविका संध्या देवगडे, आशा स्वयंसेविका शारदा तुराणकर, ग्रामसेवक, शिक्षकवूंद तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. हे स्वच्छता अभियान 22 एप्रिल 2022 पर्यंत व पुढेही सुरू ठेवू असे आश्वासन ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिले. कार्यक्रमाचे संचालन विषय शिक्षक संजय कोथडे , प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. टी. वाकडे तर आभार प्रदर्शन सुधा शेंडे यांनी केले.