Home
HomeBreaking Newsजनतेच्या सहकार्यातून वाघ मोहीम राबविण्याच्या आमदार सुभाष धोटे यांची वणाधिकार्याना सूचना

जनतेच्या सहकार्यातून वाघ मोहीम राबविण्याच्या आमदार सुभाष धोटे यांची वणाधिकार्याना सूचना

 

तोहोगाव,(संतोष कुंदोजवार)-

तोहोगाव परिसरातील वाघाच्या हल्यामुले जनता भयभीत असून जनतेच्या सहकार्यातूनच वन विभागानी योग्य नियोजन करून भयमुक्त वातावरण करावे तसेच वाघाचे हल्ल्यात जखमी झालेल्या कुटूंबाना तसेच ज्या पशुपालकाचे जनावरे ठार केले त्या पशुपालकांना तात्काळ भरीव आर्थिक मदत करावे,अशी सूचना आमदार सुभाष धोटे यांनी वणाधिकार्याना केले
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव ,आर्वी,वेजगाव भागात मागील आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घालीत दोन इसमावर हल्ला करून जखमी केले तर 15 पाळीव जनावरे ठार केले यामुळे परिसरात दहशत असून जनतेत संताप व्यक्त होत आहे प्रकरण अधिक तीव्र होऊ नये आणि यावर उपाययोजना ठरविण्याबाबत आमदार सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली वन विभाग,पोलीस,महसूल,विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत मुख्यवनसरक्षक प्रकाश लोणकर ,उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तहसीलदार के डी मेश्राम,वन प्रकल्प चे विभागीय वन अधिकारी विवेक मोरे,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार,कोठारो पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण,धाबा चे ठाणेदार सुशील धोकटे लाठीचे ठाणेदार फाल्गुन घोडमारे,वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे,वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे,सचिन वाघमोडे हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

तसेच तोहोगावचे सरपंच अमावस्या ताडे,लाठीचे उपसरपंच साईनाथ कोडापे,सरपंच मनीषा वाघाडे,वनिता रागीट,,फिरोज पठाण,प्रकाश उत्तरवार,नीलकंठ रागीट,मदन खामनकर,प्रवीण मोरे,आदी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी वाघ हल्ल्याबाबत केलेल्या उपाययोजना बाबत वणाधिकार्यानी माहिती दिली तर नागरिकांनी वाघाचे सतत होणारे हल्ले व अल्पशी आर्थिक मदत,जळाऊ निस्तार लाकडे,व शेती सरक्षणाकरिता सौर कुंपण ची मागणी बाबत समस्या मांडले
आमदार सुभाष धोटे यांनी वाघ हल्ल्यापासून नागरिक व पाळीव जनावरे कसे सुरक्षित राहतील तसेच वन्यप्राणी हल्यात जखमींना तात्काळ मदत देण्याबाबत सूचना दिल्या व जनतेनेही वणाधिकार्याच्या सहकार्यातून याचे नियोजन करण्याचे सूचना दिल्या,
“जनतेनेही वणाधिकार्याना योग्य सहकार्य करावे ,तसेच वनविभागांनी शेती संरक्षण सौर ऊर्जा कुंपण योजना प्रभावी राबवून वन्यजीव पासून होणाऱ्या नुकसानीची मदत तात्काळ देण्यात यावी”,,
– सुभाष धोटे आमदार सुभाष धोटे,,
“वाघ जेरबंद करण्यासाठी पोलीस वनकर्मचारी संयुक्तपणे मोहिमेत योग्य उपाययोजना सुरू असून जनतेनेही सहकार्य करावे”,,

# प्रकाश लोणकर,मुख्यवनसंरक्षक:-

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !