
सावली- रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावलीचे विद्यमान संस्था सचिव प्रा.सौ.विशाखाताई चंद्रकांत गेडाम यांनी आपले स्थान भुषविले.या कार्यक्रमाला माजी संचालक आर.के.गेडाम , डॉ.एच.जे.दुधे,प्रा.एन.एल शेंडे सर,प्रा.पी.जी.रामटेके, पर्यवेक्षक एम.डि.लाकडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.तारिका लाडे चंद्रपूर व धर्मानंद मेश्राम उपस्थित होते.
प्रथम शांतीदूत तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर बुद्ध धम्म आणि संघ वंदना घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एन.एल.शेंडे सर यांनी केले.
संस्थेची स्थापना झाली तेवापासून प्रथमच महिलेला ध्वज फडकविण्याचा बहुमान प्राप्त झाला यामुळे महिला मध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे.
प्रमुख मार्गदर्शक यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांशी संवादाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे विचार आत्मसात केले तरच आपला उद्धार होऊ शकतो.
संस्था सचिव प्रा.सौ.विशाखा चंद्रकांत गेडाम मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना समानतेचा अधिकार पटवून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्हि.के.गायकवाड एस.एल.बन्सोड आणि जी.एन.मेश्राम यांनी केले,तर आभार प्रा.कन्नाके सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
