सामदा बुज येथे सेवा सहकारी सोसायटी वर शेतकरी विकास आघाडी पॅनल चा दणदणीत विजय

48

 

सावली तालुक्यातील सामदा बुज येथे नुकताच झालेल्या सेवा सहकारी सोसायटी च्या निवडनुकीत शेतकरी विकास आघाडी पॅनल च्या 13पैकी 13 ही उमेदवार यांनी विजय संपादन केला. पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शन खाली सदर निवडणूक झाली.
यात इतर मागास प्रवर्ग चे उमेदवार दिवाकर पाटील भांडेकर.अनु जमाती बाबुराव सुरपाम.महिला राखीव लीलाबाई कोहळे. सयाबाई पिपरे.सर्व साधारण प्रवर्ग विनोद भांडेकर, मुकुंदा भांडेकर,दामोधर भांडेकर,विलास भांडेकर,प्रशांत कोहळे,प्रशांत पुण्यप्रेडिवार, अनिल कोहळे,टीकाराम रोहनकर ,एन टी प्रवर्ग श्रावण साखरे
असे 13 पैकी 13 ही उमेदवार निवडून आले. सदर निवडनुक भाजपा चे तालुका अध्यक्ष अविनाश पाल याच्या परिवर्तन पॅनल चा दणदनीत दारुण पराभव करून शेतकरी विकास पॅनल विजय मिळवून वरील सेवा सहकारी सोसायटी वर झेंडा रोवला.

13पैकी 13ही उमेदवार निवडून येण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दिवाकर पाटील भांडेकर. प्रदीप गद्देवार स्वीय सहायक पालकमंत्री. विनोद पा भांडेकर.स्वप्नील पा भांदेकर. ढिवरू कोहळे. पुरुषोत्तम कोहळे. आणि कांग्रेस कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.