Home
HomeBreaking Newsअखेर वाघाने लोकांच्या जमावावर धाव घेत दोघांना केले जखमी; जनतेत प्रचंड संताप

अखेर वाघाने लोकांच्या जमावावर धाव घेत दोघांना केले जखमी; जनतेत प्रचंड संताप

राजुरा (संतोष कुंदोजवार)-
आठवडा पासून धुमाकूळ घालित असलेला वाघ आजही गावालगतच्या झुडपात असल्याची माहिती मिळताच लोक वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असताना चवताळलेल्या वाघाने जमावावर हल्ला चढवित दोघांना गँभिर जखमी केल्याची घटना आज दुपारी तोहोगाव येथे घडली सुदैवाने जीव हानी झाली नाही शरद बोपणवार राहणार तोहोगाव आणि सुरेश मत्ते राहणार विरुर स्टेशन असे जखमींची नाव आहे परंतु या घटनेनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असुन तात्काळ वाघाला जेरबंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वनविभागाला जनतेनी दिला आहे.

मागील आठवड्यापासून गोंड पिपरी तालुक्यातील तोहोगाव ,आर्वी,वेजगाव परिसरात वाघाने गावालगतच धुमाकूळ घातला असून 5बैल,बकरी,मैस ठार केले आहे यामुळे जनतेत वाघाची
दहशत असल्याने रात्र दिवस जागून काढीत आहे पोलीस व वनकर्मचारीही संयुक्त गस्त करीत आहेत परंतु वन विभागाने वाघाला जेरबंद करण्याची मोहीम गंभीरपणे घेतलेली नाही केवळ देखावा म्हणून एक पिंजरा लावण्यात आला तर मोजके ट्रॅप कॅमेरा लावून शेकी मिरवून घेत आहेत दरम्यान आज अकरा वाजेच्या सुमारास तोहोगाव आर्वी मार्गातील नाल्यालगतच्या झुडपात वाघ लपून बसल्याची वार्ता परिसरात पसरली जो तो वाघाला पाहण्यासाठी त्या स्थळी धाव घेतली वन कर्मचारी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु लोक वाघाला हुसकावून लावण्यासाठी दगड मारू लागले आणि वाघ चवताळला व लोकांचे दिशेने हल्ला चढवीला यामूळे लोकांची धावाधाव झाली यात वाघाने हल्ला करून तोहोगाव येथील शरद बोपणवार,विरुर स्टेशन येथील सुरेश मत्ते यांना गँभिर जखमी केले जखमींना तात्काळ तोहोगाव आरोग्य केंद्रात उपचार्थ भरती केले आहे
या घटनेनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून तात्काळ वाघाला जेरबंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनतेनी दिला आहे

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !