सावली येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे आंदोलन

119

 

सावली(प्रतिनिधी)
राज्यामध्ये लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करीत आहे. त्यात सावली तहसिल कार्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना हटवून जुनी पेन्शन योजना लागू करावी. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील सभासदांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना विनाअट सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात यावा.नायब तहसिलदार सर्वांगातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण 33% वरून 20 % करावे वमहसूल सहाय्यक, शिपाई व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवून तातडीने भरावी व इतर एकूण 12 मागण्यांसाठी सावली तहसील कार्यालयासमोर कर्मचारी संघटना आंदोलन करत आहे.

या मागण्या शासनाने त्वरित मंजूर करावे अशी मागणी कर्मचारी यांनी केली आहे. त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष राजेश सोरते, दत्तात्रय खाटीक,धमेन्द्र वैद्य, विजय तिरणकर, नागराज कवंडर,राकेश परचाके,विजय आखाडे ,भारती नंदागवळी ,दुर्वास नाटे, गुरुदास गेडाम,कुंदा जराते व इतर कर्मचारी हे आंदोलन करीत आहेत.

https://public.app/s/5vtnS                                                          (👆 वीडियो बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा… )