अवैध गोवंश तस्करीत 19 गोवंश जनावरे पकडली

46

 

 

सावली पो.स्टे हद्यीतून दि.१२/०४/२२ रोजी रात्रीदरम्यान अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशा गुप्त माहीतीवरून व्याहाड नजीक चिचबोडी फाटा येथे अचानक नाकाबंदी केली असता सकाळी अंदाजे ०३:३० च्या सुमारास मिळालेल्या गुप्त खबरेनुसार गडचिरोली दिशेकडून एकामागोमाग येणारे अशोक लेलँड वाहन क TS 07 UF 3182 ट्रकला थांबवले.

मिळून आलेल्या सदर ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये लहानमोठे एकूण १९ गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले. सदरचे १९ गोवंश जनावरे कीमत अं १,९०,००० रू अशोक लेलँड कंपनीचे ट्रक क TS 07 UF 3182 कीमत १०,००,००० रू असा एकूण ११,९०,००० रू चा माल घटनास्थळी जप्त करण्यात आला. सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले.

आरोपी क १) इब्राहीम खान हमीद खान वय ३० वर्ष रा. अन्सारी रोड राजेंद्रनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश व आरोपी क्र ०२) ट्रक क TS 07 UF 3182 चा मालक अशा दोन आरोपीतांविरूद्ध महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५ (अ), (ब), प्राण्यांना करतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११डी, एफ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९, मोटरवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे,अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे साहेब, ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा फौजदार लक्ष्मण मडावी, पितांबर खरकाटे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक चव्हाण, धिरज पिटुरकर, चालक कुळमेथे यांनी केली.