Home
HomeBreaking Newsकपीलची आत्महत्या नसून घातपात ;कुटूंबियांचा पत्रपरिषदेत आरोप सखोल चैकशीची मागणी

कपीलची आत्महत्या नसून घातपात ;कुटूंबियांचा पत्रपरिषदेत आरोप सखोल चैकशीची मागणी

 

गोंडपिपरीतील महिंद्रा होम फायनन्स मध्ये रोखपाल या पदावर कार्यरत कपील वराते या तरूणाचा कार्यालयातच गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणी कपीलने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी पत्रपरिषदेतून केला.
याप्रकरणाची सखोल चैकशी करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.

3 एप्रिल रोजी गोंडपिपरीस्थित महिंद्रा होम फायनन्सच्या कार्यालयात रोखपाल कपील वराते या 28 वर्षीय मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता.दरम्यान कपीलने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.मात्र या घटनेबाबत कुटुंबियांनी आता विविध शंका उपस्थित केल्या आहेत.कपीलचे पुढच्या महिन्यात लग्न होते.तो कुठल्याच आर्थीक विवंचनेत नव्हता.आपल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर पोलीस व महिंद्रा होम फायनन्स च्या कार्यालयाकडून आम्हाला कुठलीच माहिती देण्यात आली नाही.

 

घटनेनंतर खुप उशीराने कपीलचा अपघात झाला हि माहिती गावातून मिळाल्याने आम्ही गोंडपिपरीला पोहलचो.मात्र तिथे गेल्यानंतर कार्यालयातच कपीलचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह असल्याचे समजले.घटनास्थळी कार्यालयाचे शटर बंद करून पोलीस चैकशी करित होते.

आणी आम्हाला बाहेर रोकण्यात आले.चौकशी अंती कार्यालयाचे शटर उघडण्यात आले.तेव्हा मृतदेह बघण्यासाठी आम्ही गेलो यावेळी कपील ज्या अवस्थेत होता ती अवस्था बघून त्याने आत्महत्या केली असे वाटत नसल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे.

कपील हा चेकदरूर येथील रहिवाशी होता.ज्या दिवशी त्याचा मृतदेह गोंडपिपरीतील कार्यालयात आढळला.व घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली नव्हती.त्याच वेळी चेकदरूर येथील एक तरूणी वराते कुटुंबियांना घटनेची माहिती न देता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचली.व घटनेनंतर प्रत्येक सोपस्कारात ति पुढाकार घेत होती.यामुळे वराते कुटुंबियांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे.घटनेला आठ दिवस लोटले मात्र पोलीसांनी अदयापही कुटंुबियांचे बयाण नोंदविले नाही.व या प्रकरणाची कुठलीच चैकशी केली नाही.

दरम्यान ती तरूणी गावात नसल्याने कुटुंबियांचा संशय अधिक बळावला.आहे.

कपीलने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला आहे.असा आरोप करित याप्रकरणाची सखोल चैकशी करावी जेणेकरून सत्य समोर येईल अशी मागणी कपीलची आई कुसुम वराते व भाउ देविदास वराते यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.याप्रकरणी पोलीस अधिक्षकाकडे तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !