
सावली शहरात श्रीराम सेवा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्याला सावलीकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला.

सावली शहराच्या मध्यभागी असलेल्या व्यंकटेश मंदिरातील राम,लक्ष्मण, सीता,हनुमान मूर्ती समोर सकाळी सात वाजता पूजन करून धार्मिक कार्याला सुरुवात करण्यात आली.
दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव व भजन मंडळी भजन गाऊन व गोपाल काला कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर सायंकाळी सहा वाजता व्यंकटेश मंदिर ते विठ्ठल मंदिर, सावता माळी चौक, महात्मा फुले चौक, बस स्थानक चौक, मेडिकल चौक, व्यापारपेठ या मार्गाने व्यंकटेश मंदिरात नेण्यात आली.
यावेळी शोभायात्रा मध्ये लहान बालके राम, लक्ष्मण,सीता,हनुमान,व वाल्मिक ऋषी ची वेशभूषा केलेली होती. मुख्य मार्गाने जात असतांना फटाक्यांची अतिष बाजी करण्यात आली.
व जय श्रीराम चा जय घोष देण्यात आले.सदर शोभायात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी श्रीराम सेवा समिती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.
या शोभायात्रेमध्ये सावली शहरातील शेकडो रामभक्त महिला, पुरुष ,बालगोपाल सहभागी झाले होते.यावेळी सावली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
