क्रांतीसुर्य युगपुरुष महात्मा ज्योतिबा फुले जयंती पंचायत समिती सावली येथे संपन्न

53

 

प्रतिमेला दीपप्रज्वलन माल्यार्पन करून गट विकास अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी केले विनम्र अभिवादन

पंचायत समिती कार्यालय सावली येथे आज दि. ११/०४/२०२२ ला बहुजनांचे उद्धारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, युगपुरुष क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती चे औचित्य साधुन विनम्र त्रिवार अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकताना उपस्थित मान्यवर गट विकास अधिकारी यांनी संबोधित करताना म्हटले की, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक, ज्ञानसुर्या मुळेचं भारतीय महिला साक्षर झाली, स्त्रीयांना स्वतः चे अस्तित्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही प्रावीण्य मिळवून नावलौकिक करीत आहे.

या महान युगपुरूषामुळेचं आज समाज निर्मळ झाला आहे. म्हणूनचं तर प्रत्येकांच्या मनात आदर एकमेकांप्रती सामाजिक प्रेमभावना निर्माण झाली आहे.

अशा थोर विचारवंत अस्पृश्यता निवारक, सत्यशोधक शेतकरी हितरक्षक , कांतीसुर्यांचे विचारसरणी अंगीकारल्यास सर्व सामान्यास सुद्धा जीवनाचं सोनं करता येईल असे प्रतिपादन केले.

त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी सुद्धा महात्मा फुलेंच्या जिवनावर प्रकाश टाकला.
यावेळी पंचायत समिती सावली चे गट विकास अधिकारी सुनिता मऱ्हसकोले, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशिल आडे तसेच पंचायत समितीचे सर्व विभागीय अधिकारी तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.