हरांबा गावामध्ये रामनवमी जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली….

53

हरांबा प्रतिनिधि
(मोहित मुद्दमवार)
सावली तालुक्यातील हरांबा गावातील समस्त ढिवर-भोई समाजातर्फे आज दिनांक १० एप्रिल २०२२ ला हरांबा येथे रामनवमी जयंती साजरी करण्यात आली. रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी ठीक ५ वाजता ग्रामस्वच्छता अभियानाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर सडा शिंपळून महिला भगिनी रांगोळी काढून आपल्या अंगणाची सजावट करण्यात आली होती. सकाळी ७ वाजता स्नान करून स्त्री-पुरुष, लहान बालक आकर्षक वेशभूषेत श्री.राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी सुसज्ज असा बँड पथक, लेझीम पथक, लहान मुलांचे डान्स तसेच लाऊड स्पीकरच्या माध्यमातून श्री रामकथा ऐकवली गेले. यावेळी रसिक भजन श्रोत्यांना भजनाची मांदियाळीही पाहायला मिळणार आहे, सर्व गावातील ढीवर – भोई युवा मुलांच्या हस्ते खूप छान कार्यक्रम उभारण्यात आले होते. आणि सर्व गावातील लोक रामनवमी कार्यक्रमाला उपस्थित होते.