सेवा सहकारी संस्था मर्या पाथरी च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कॉँग्रेस समर्थीत किसान विकास पॅनल चा विजय

59

 

सावली तालुक्यातील पाथरी सेवा सहकारी संस्था पाथरी ची संचालक मंडळाची दिनांक 10/4/2022 रोजी एकूण 13 जागेसाठी निवडणूक पार पडली ही निवडणूक कॉँग्रेस समर्थीत किसान विकास पॅनल ने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात व सावली तालुका कॉँग्रेस चे माजी अध्यक्ष आदरणीय राजेश सिद्धम यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली होती.

यामध्ये 13 पैकी 12 जागेवर दणदणीत विजय मिळवीले यात विजयी उमेदवार.

सर्वसाधारण गट :-
1) ठिकरे खुशाब तुकाराम
2) मेश्राम मुकेश बाबुराव
3) शेंडे मधुकर नामदेव
4) चौधरी लोकेश कवडू
5) गंडाटे मोरेश्वर रामकृष्ण
6) जुमनाके मुखरू डोनू
7) कुळसंगे मुखरू पत्रू
8) राखडे जयंत रामचंद्र
महिला राखीव गट :-
1) सौ मडावी वंदना अनिल
2) श्रीम. वालदे महानंदा मधुकर
अनु जाती राखीव गट :-
1) सहारे श्रीनिवास गोसाई
भटक्या वी जा / जमाती गट:-
1) गेडाम कान्हू कोंडूजी हे होते.

भाजप समर्थित शेतकरी- शेतमजूर विकास पॅनल तर्फे अशोक ठीकरे हे एकच उमेदवाराला विजय संपादन करता आले. यामुळे पाथरी सेवा सहकारी संस्थेमध्ये काँग्रेस समर्थित किसान विकास पॅनलचे बारा उमेदवार विजयी झाले असून पाथरी येथील काँग्रेस पक्षातील सर्व विजयी उमेदवारांनी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले.