Home
Homeमहाराष्ट्रविरुर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

विरुर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

 

विरूर स्टेशन ( प्रतिनिधी)

छत्रपति शिवाजी महाराज मित्र मंडळ विरुर स्टेशन नवयुवक उत्साह मंडळ विरुर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक विरूर येथे थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गावात प्रथमच साजरी करण्यात आली यावेळी गावातील विविध जाती धर्माचे बहुसंख्य लोक उपस्थित होते , सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून पुष्पहार अर्पण करून त्या महामानवना अभिवादन करण्यात आले यावेळी सदानंद वडतकर ठाणेदार भारी पोलीस स्टेशन ,श्रीनिवास इल्लदुला उपसरपंच विरूर ,भीमराव पाला अध्यक्ष मातंग समाज विरुर ,सुरेंद्रपाल सिंग बवेजा , शकील भाई ,नथुजी पिपरे ,राघोबा निमकर ,अरुण चौधरी तसेच माळी समाज महिला मंडळ च्या बहुसंख्य सदस्या प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रम चे संचालन रवींद्र चांदेकर तर आभार शाहू नारनवरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करिता तुषार मोरे ,अविनाश रामटेके ,नयन उराडे ,प्रदीप देठे ,विक्की मोरे ,मोरेश्वर कडुकर ,प्रवीण चिडे ,योगेश बक्षी ,राकेश रामटेके ,हितेश गाडगे यांनी अथक परिश्रम घेतले

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !