Home
HomeBreaking Newsतोहोगाव परिसरात वाघाची डरकाळी,, आणि रात्रीच्या भरनियमानी दहशतीचे वातावरण

तोहोगाव परिसरात वाघाची डरकाळी,, आणि रात्रीच्या भरनियमानी दहशतीचे वातावरण

रात्रीचे भारनियमन बंद करा-आमदार सुभाष धोटे

तोहोगाव(संतोष कुंदोजवार)-
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात आठवडयापासून वाघाने धुमाकूळ घातला असून गावालगत सतत पाळीव जनावरांवर हल्ला करीत ठार करीत आहे,एकीकडे वाघाचे हल्ले आणि दुसरीकडे विद्युत विभागाचे रात्रीचे भारनियमन असल्याने नागरिक रात्र जागून काढीत आहेत यामुळे ग्रामस्थ चांगलेच वैतागले असून शासन आदेशाप्रमाणे नक्षलग्रस्त तथा वन्यप्राणी प्रभावित क्षेत्रातील रात्रीचे भारनियमन रद्द करण्याची जनतेची मागणीची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी विद्युत विभागास चांगलेच खडसावले आहे ,भारनियमन बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला

मध्य चांदा वन विभागचे धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तोहोगाव येथे आठवळ्यात वाघाने हल्ले करून बैल व बकरी ठार केले इतर जनावरे जखमी केले आहे वाघाचे सतत हल्ले होत असल्याने ग्रामस्थात दहशत पसरली आहे ग्रामस्थाचे मदतीला वन कर्मचारी,पोलीस कर्मचारी सुद्धा दिवस रात्र गस्त करीत आहेत.

यातच विद्युत विभाग नक्षग्रस्त,जंगलव्याप्त वन्यप्राणी वावर असलेल्या क्षेत्रात रात्रीचे भासरनियमान करू नये असा शासन निर्णय असतानाही तोहोगाव,आर्वी,वेजगाव, लाठी,वामानपल्ली या अतिसवेदान परिसरात रात्रीचे भारनियमन करीत आहेत
एकीकडे वाघाची दहशत असताना रात्रीचे भारनियमामुळे या परिसरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे ही समस्या तोहोगाव येथील कांग्रेसचे माजी उपसरपंच फिरोज पठाण,प्रवीण मोरे,नीलकंठ रागीट,उज्वला ठेंगणे,रमेश टेकाम,भाऊजी टेकाम,संजय बोपणवार,गजानन ठमके, यांनी आमदार सुभाष धोटे यांचे लक्षात आणून दिली याची तात्काळ दखल घेऊन विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकाऱयांना चांगलेच खडसावले असून रात्रीचे भारनियमन रद्द करावे अन्यथा जनतेला
तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे बजावले आहे

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !