वाघाने गावालगतच्या गोठ्यातील बैल केला ठार;15 तासापासून वाघ ठाण मांडून

56

गोंडपीपरी,(प्रतिनिधी)-,,
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील बंडू मोरे यांचे गावालगत असलेल्या गोठ्यात रात्री वाघाने हल्ला करीत गोठ्यातील एका बैलाला ठार केले तर दुसर्या बैलास जखमी केले जखमी बैल गावात येताच वार्डातील लोक गोठ्याकडे जाऊन पहाताच वाघ ठार केलेल्या बैलाचे मास खात असल्याचे दिसून आले ही वार्ता गावात पसरताच लोकांनी वाघाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थ घरी परतले,
परत आज दुपारच्या सुमारास त्याच परिसरात संजय गिरसावले यांचे बैलावर हल्ला केला असून वाघ त्याच परिसरात दडून बसलेला आहे.

याची माहिती वन विभाग व पोलिसांना देताच पोलीस,वन कर्मचारी,ग्रामस्थ त्या वाघाला हाकलून लावण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे.

गावालगतच वाघाच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थात चागलीच दहशत पसरली असून या वाघास पकडण्याची मागणी तोहोगाव वासीय करीत आहेत.