
राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना

विरुर स्टेशन(तिरुपती नल्लाला)-
वडिलांच्या निधनानंतर शेती व घराचे संपत्ती वाटणीवरून सावत्र आई व तिचे मुलांसोबत वाद विकोपाला गेला आणि चक्क कोयत्याने सावत्र आईला वार करून गंभीर जखमी केल्याची घटना राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली
विरुर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डोंगरगाव येथे राहणारे ताकसांडे कुटूंबात वडिलांचे मृत्यू नंतर संपत्ती वरून नेहमी वाद होत होते काल व्यकटेश ताकसांडे हा आपल्या आईला घेऊन सावत्र भाऊ दीपक ताकसांडे याचे घरी जाऊन संपत्ती बाबत चर्चा केली चर्चा नंतर वाद विकोपाला गेला आणि दीपक ताकसांडे यांनी कोयत्याने सावत्र भाऊ व्यकटेश यांचेवर वार करण्याचा प्रयत्न केला प्रसंगावधान होऊन तो तिथून पळून गेला परंतु त्याची आई लक्ष्मीबाई तिथेच असल्याने आरोपी दिपकने सावत्र आईवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले
याची तक्रार विरुर पोलीस ठाण्यात होताच सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण पोलीस कर्मचाऱ्यासह जाऊन आरोपी दीपक रतन ताकसांडे व कुलवंत रतन ताकसांडे यास ताब्यात घेऊन अटक केले आहे व जखमी महिलेस उपच्चारार्थ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले
या घटनेची माहिती होताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली याघटनेत आरोपी विरुद्ध भादवी च्या कलम 307,504,506 आणि आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
