
##############
##################
सावलीपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या उसेगाव येथे भगवान आवारी यांच्या घरात पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या घुसला.

चार जण घरात झोपले होते. पहाटे लघविसाठी सिंधुबाई उठल्या. तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. तेव्हा उठून पाहण्याचा प्रयत्न केला असता शशिकला बाई यांना बिबट्या बाहेर दिसला मात्र, तिने प्रतिकार करीत जीव वाचविण्यासाठी घराबाहेर घाईने निघून गेली. तेव्हा बिबट असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती सावली वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सावली येथील वनरक्षक चौधरी यांनी पाहणी केली. त्यानंतर सर्वत्र घटनेची माहिती देण्यात आली.
आज सकाळी 8 वाजता वनविभागाची टीम आणि इको प्रो चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.आणि यावेळी पिंजरा लावले बिबट ला त्यात अडकविण्यात यश आले आहे.यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी केली होती
.
सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे स्वतः बंदोबस्त मध्ये उपस्तीत होते.यावेळी विभागीय वनाधिकारी चंद्रपूर चे प्रशांत खाडे ,सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी व इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे,व वनविभाग सावली चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
