माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भाजपाचे साडेतीन तास चक्काजाम आंदोलन

56

फक्त आणि फक्त भ्रष्टाचार हा मविआ सरकारचा एकमेव अजेंडा : प्रा. अतुल देशकर

ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 14 तास वीज, घरकुल लाभार्थ्यांचे पैसे, धानाचे चुकारे व धानाला 700 रुपये बोनस मिळावा या मागणीसह भारतीय जनता पार्टीच्या वतीने ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपुरी- गडचिरोली नॅशनल हायवेवरील गांगलवाडी टी-पॉईंट वर तब्बल साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. या प्रसंगी आभासी माध्यमातून भाजपा नेते, माजी अर्थ मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात हे सरकार सातत्याने निर्णय घेत आहे. भाजपा सरकारने मागील ५ ही वर्ष शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज, धानाला बोनस देण्याचे काम केले परंतु हे सरकार शेतकर्‍यांच्या समस्यांकडे कानाडोळा करीत शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं काम करत आहे.

फक्त फक्त आणि फक्त भ्रष्टाचार हा सरकारचा एकमेव अजेंडा असल्याची टीका ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केले. या सोबतच प्रशासनातील काही अधिकारी भ्रष्टाचारात शामिल असल्याचा आरोप ही माजी आमदार देशकर यांनी या वेळे केला.

चंद्रपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही मविआ सरकारचा खरपूस समाचार घेतला. शेतकरी, जनतेसाठी काम करण्याची इच्छाशक्ती या सरकारमध्ये नसल्याचे त्यांनी यावेळे सांगितले.

या प्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, महामंत्री कृष्णा सहारे, ज्येष्ठ नेते अरुण शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बालपांडे, माजी सभापती रामलाल दोनाडकर, माजी सभापती वंदना शेंडे, माजी उपसभापती सुनीता ठवकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊराव ठवकर, माजी जि.प सदस्य शंकर सातपुते, महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, महामंत्री मनोज भूपाल, युवा नेते ज्ञानेश्वर भोयर, सुरेखा बालपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत राज्यातील नाकर्त्या सरकारचा निषेध नोंदविला.

आंदोलना दरम्यान महावितरणाच्या अधिकाऱ्यांना भाजपाने धारेवर धरत कृषी पंपाला वीज मिळण्याच्या समस्यांबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला भाग पाडले.

या चक्काजाम आंदोलनाला भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्य. सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, जेष्ठ कार्यकर्ते राजेश्वरजी मगरे, पांडुरंग भोयर, मेंडकीचे माजी सरपंच युवा नेते यशवंत आंबोरकर, अरविंद नंदूकर, साकेत भानारकर, अरविंद कुंभारे, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, ज्ञानेश्वर दिवठे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित रोकडे, सचिव पवन जयस्वाल, गोलू बालपांडे, मुईचे सरपंच उमेश घुले, बंटी गोंदोळे, विलास वाकुडकर, विलास डोंबळे, युवा नेते अविनाश मस्के, तेजस दोनाडकर, सचिन ठाकरे यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.