
पोलीस स्टेशन सावली हद्यीतील व्याहाड ते गडचिरोली रोड वरील चुनारकर पेट्रोल पंप येथे दि.२९/०३/२२ रोजीचे रात्रीदरम्यान अज्ञात इसमांनी पेट्रोल पंपावरील डीझेल टॅकच्या होल मध्ये पाईप टाकून १०८१ लीटर डीझेल चोरी झाल्याचे पेट्रोल पंप मालकास लक्षात आले.

ही घटना माहीत होताच रोहणकर पेट्रोल पंप येथे सुद्धा दि.२७/०३/२२ रोजीच्या रात्रीदरम्यान अशाच प्रकारे १६४० लीटर डीझेल काढून चोरी झाल्याचे रोहणकर पेट्रोल पंप मालकास लक्षात आले दोन्ही प्रकरणात एकूण २७२१ लीटर डीझेल की २,६७,२३४ रू चोरी झाल्यावरून फीर्यादीने दि.०१/०४/२२ रोजी दिलेल्या रिपोर्टनुसार अज्ञात आरोपीतांविरूद्ध भादवी कलम ३७९,३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या तपासात पथक नेमून तांत्रीक मदतीने तसेच प्राप्त माहीतीच्या आधारे रात्रीदरम्यान गडचिरोली रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोलींग करत पाळत ठेवली होती.त्यानुसार दि. २/०४/२२ रोजीच्या पहाटे दरम्यान चुनारकर पेट्रोलपंप परीसरात बोलेरो वाहन संशयीतरित्या
उभी दिसून आली असता त्यात असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून कसोशीने विचारपुस केली असता त्यांनी उपरोक्त नमूद दोन्ही पेट्रोल पंपावर रात्रीदरम्यान टॅक मध्ये पाईप टाकून सक्शन पंपाद्वारे डीझेल चोरी केल्याचे कबुल केले.
पोलीसांची चाहूल लागताच बाहेर फीरत असलेले सदर आरोपीतांचे इतर सहकारी आरोपी पळून गेले. सदरचा गुन्हा निष्पन्न झाला असून आरोपी क १) काशीनाथ उर्फ विजय दिलीप हत्ते वय २४ वर्ष रा.आलमडा ता.औसा जि.लातूर आरोपी क २)पिंटू पोपट पवार वय ३४ रा. येरमळा ता कळंब जि उस्मानाबाद यांना गुन्हयात अटक केली असून पोलीस कस्टडीत आहेत.
यातील फरार आरोपी यांचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे,अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे ,पो.स्टे सावली ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि शशिकर चिचघरे,सहा.फौजदार रामकीसन बोधे,नापोका केवल तुरे,करमचंद दुर्गे,पोलीस कॉन्स्टेबल धिरज पिदुरकर यांनी केली.