
ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील निसर्गरम्य वातावरणात १५ एकर जागेत १५ कोटी रुपयांच्या निधीतून विपश्यना केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाची मंजुरी नुकतीच मिळाली आहे.

सदर विपश्यना केंद्राच्या जागेची पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अड्याळ येथे भेट देऊन प्रत्यक्षरित्या पाहणी केली. व संबंधित अधिकाऱ्यांकडून विपश्यना केंद्र विकासाचा आराखडा पाहणी करून सूचना केल्या.
विपश्यना केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याबद्दल आनंदित गावकऱ्यांनी पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा सत्कार केला. त्यांनी नम्र स्वीकार करून पुढील विकासकामांसंदर्भात चर्चा केली.
यावेळी बोलतांना पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले की, लवकर निर्णय – त्वरित मान्यता – वेगाने काम या सूत्रानुसार प्रत्येक विकासकामाबाबत काम करण्याचे आपले धोरण राहणार असुन ते पुढे सुद्धा सुरू राहणार आहे.
यावेळी तहसीलदार उषा चौधरी, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोक रामटेके, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, ज्येष्ठ पत्रकार जीवन बागडे,
पं.स. माजी सभापती नेताजी मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष कुरेशी, सुरज मेश्राम, हेमंत सेलोकर, प्रशांत डांगे, सतीश डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अजय चहांदे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.