महा जीवीका अभियान व गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धनश्री स्वयम् सहायता समूह गेव्हरा बूज यांच्या विद्यमाने घरकुल मार्ट चे उद्घाटन संपन्न.

31

सावली:- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यात कार्य करीत आहे.

महिलांनी समोर येऊन विविध व्यवसाय सुरु करावेत हा माणस डोळ्यासमोर ठेवून व डॉ.मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली घरकुल मार्ट ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम तालुक्यात सुरू आहे.

धनश्री स्वयम् सहायता समूह गेव्हरा बूज व शक्तिस्वरूपा महिला ग्रामसंघ यांचा संयुक्त उपक्रमातून श्रीमती मारस्कोले गट विकास अधिकारी, पं. स. सावली यांच्या शुभ हस्ते व परसवार सर विस्तार अधिकारी पंचायत तथा ग्रामसंघ अध्यक्ष सचिव व समूहातील सदस्य यांच्या उपस्थितीत घरकूल मार्ट चे उद्घाटन करण्यात आले.

 

घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना स्वतःच्या गावाशेजारी व स्वतःच्या गावात घरकुल बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य वेळेत व वाजवी दरात उपलब्ध व्हावीत व महिलांचा व्यवसाय सुद्धा सुरू होवून महिला उद्योजकीय बनावेत या करिता ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली जात असल्याचे गट विकास अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडले.

सदर कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यातील सर्व अधिकारी/कर्मचारी ,समूहातील महिला सरपंच सुषमा मुंनघाटे, गेव्हरा बूज उषाताई बानबले सरपंच गेव्हरा खुर्द तसेच गावातील सर्व कॅडर,सर्व ,प्रभागातील समुदाय संसाधन व्यक्ती MSRLM तालुका चमू यांची उपस्थिती होती.