
वनविभागाने बिबट्याच तात्काळ बंदोबस्त करावा – परिसरातील नागरिकांची मागणी..

– कवठी, पारडी, उसेगाव परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन अनेक लोकांना झालेले आहे. मागील काही दिवसांपूर्वीच लालाजी झरकर यांच्या शेतात दर्शन झाले होते.
तेव्हा वनविभागाने कॅमेरे बसविले पण त्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला नाही. दिनांक 2 ला रात्रौ रुद्रापूर लगत कनार शेतशिवारात वारलूऊजी चिताडे यांच्या शेतात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढवीला.
तेव्हा मेंढपाळांची कुत्रे बिबट्याच पाठलाग केल्याने बिबट्या झाडावर चढून राहिला. तेव्हा मेंढपाळ घाबरून जाऊन एका मेंढपाळाने गावच्या पोलीस पाटील सौ. शांताबाई ए. बोरकुटे यांना माहिती दिली त्यांनी लगेच वनविभागाला कळविले.सद्या बिबट्याच्या धुमाकूळ मूळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल होऊन पहाटे ४ वाजेपर्यन्त गस्त घालून होती. बिबट्याच्या वावर या परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याच तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वनविभागाला केली आहे.