भाजपच्या महा जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा- खासदार अशोक नेते यांचे आव्हान…

50

 

गडचिरोली:- दि. 2 एप्रिल

भारतीय जनता पार्टी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, अत्याचारी, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दि. 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे महाजन आक्रोश मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला विशेष मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे माजी वित्त, नियोजन व वनमंत्री तथा आम. मा.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, विधान परिषद सदस्य तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत…

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर,नागरिक, महिला व युवक- युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम. डॉ देवरावजी होळी, आम. कृष्णाजी गजभे यांनी केले आहे.