आकाशातून पडली वस्तू जमिनीवर;नेमकी कोणती? तर्क वितर्कला उधाण;नागरिकांनी घाबरून जाऊ नका

131

आज दिनांक 2 एप्रिल ला सायंकाळी ७:४५मिनीटांनी आकाशात अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. मिसाईल सारखी एक वस्तू पश्चिम कडुन पुर्वी कडे गेली.त्यांनतर आकाशात थोड्या वेळाने बाम्बवार सारखा आवाज आल्याने नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सिंदेवाही तालुक्यातील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लाडबोरी गावातील ग्रामपंचायतीच्या मागील खुल्या काही अवशेष या परिसरात पडले.त्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही.सदर वस्तू हि तांबा मिशरीत वस्तूपासुन बनवलेली आहे असे वाटते. सदर वस्तू पडली तेव्हा ही वस्तू तप्त लाव्हा सारखी होती.व ती थोडी जमिनीत घुसली. ती रींग पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे जमा करण्यात आली आहे.तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.