रा. म. गां. महाविद्यालयात मानवधिकार प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु

84

सौरव गोहने, प्रतिनिधी 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर, व तालुका बार असोसिएशन सावली यांच्या संयुक्त विद्यमाने मानवधिकार प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला या अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक २९ मार्च २०२२ पार पडला . उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली हे होते तर उद्घाटक मा. ऍड. आंबडकर साहेब होते अतिथीस्थानी मा. ऍड गेडाम साहेब, ऍड शेंडे साहेब उपस्थित होते.

मानवधिकार प्रमाणपत्र अभ्यासक्रम तीन महिन्याच्या कालावधीमध्ये घेण्यात येणार असून मानवी जीवनामध्ये मानवधिकाराचे महत्त्व लक्षात घेता हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त स्वरूपाचा आहे तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. असे मत उद्घाटक ऍड. आंबटकर यांनी व्यक्त कले तर या ॲड-ऑन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबरोबरच जीवनाभिमुख व समाजाभिमुख ज्ञान व माहिती उपलब्ध होईल याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ऐ.चंद्रमौली यांनी केले.

 

भारतीय संविधान व मानवाधिकार यावर एड. गेडाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अशोक खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत वासाडे तर आभार डॉ. रामचंद्र वासेकर यांनी मानले कार्यक्रमाला डॉ. भास्कर सुकारे डॉ. दिवाकर उराडे, डॉ. प्रफुल्ल वैराळे , प्रा सगानंद बागडे प्रा. विजयसिंग पवार प्रा विनोद बडवाईक, प्रा. महानंदा भाकरे, प्रा. दिपिका गुरनुले, प्रा. प्रणाली खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.