अ‍ॅड. अमोल बावणे यांचा शिवसेनेत प्रवेश…

56

चंद्रपूर : – ( गांधी बोरकर )
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्ष सचिव तथा खासदार अनिल जी देसाई, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ, भद्रावती वरोरा विधानसभा संपर्कप्रमुख संजय जी काळे,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम, चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, भद्रावती शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदु पडाल व इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन मुंबई येथे अ‍ॅड. अमोल बावणे यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. ॲड.अमोल बावणे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत वरोरा- भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढविली. तसेच ते राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल चे विदर्भ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक सामाजिक संघटनेचे नेतृत्व केले आहे.

त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द चांगली असुन सामाजिक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र भर स्वतः ची ओळख निर्माण केली आहे. ते उच्च शिक्षित असून नक्कीच त्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेला जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. येणाऱ्या निवडणूकांमध्ये शिवसेनेला अ‍ॅड.अमोल बावणे यांच्या प्रवेशाने खूप मोठा फायदा होण्याची शक्यता दिसून येत आहे.

प्रथमच शिवसेनेला उच्च शिक्षित अधिवक्ता असलेला युवा नेता मिळाला आहे. अ‍ॅड. अमोल बावणे यांच्या प्रवेशाने शिवसेना कार्यकत्यामध्ये अतिशय आनंद व उत्साह निर्माण झाला असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.