ट्रकची-दुचाकी च्या अपघातातील त्या तिन्ही जखमींचा मृत्यू

0
29

गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रकने व्याहाड बुज वरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार घडली. होती.त्यातील तिन्ही गंभीर जखमी झालेले युवकांचा उपचार सुरू असतानाच निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सावली तालुक्यातील वाघोली बुटी फाट्याजवळ व्याहाड (बुज) वरुन तीन युवक गडचिरोली येथे दुचाकीने कामासाठी जात असताना वाघोली बुटी फाट्याजवळ गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रक क्र. एम. एच. 33 – 4360 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की , दुचाकीवरील तिन्ही युवक 10 ते 15 मीटर अंतरावर फेकले गेले. या भीषण अपघातात हे तिन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत.त्यात दिपक मुकुंदा मॅकलवार , रा. व्याहाड (बुज) आणि नेताजी मांदाळे व कैलास कन्नाके , दोघेही रा. वाकल जिल्हा गडचिरोली हे जखमी झाले होते. या अपघात ग्रस्त युवकांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णलायात भरती करण्यात आले.

त्याच वेळी दीपक म्याकलवार रा.व्याहड बूज याचे निधन झाले तर जखमी नेताजी मांदाळे व कैलास कन्नाके हे गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे भरती करण्यात आले मात्र त्यांनी सुद्धा आपले प्राण सोडले.म्हणजे अपघातातील तिन्ही जखमींचा मृत्यू झालेला आहे. ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला आहे.त्याचा सावली पोलीस शोध घेत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here