राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संस्काराची कार्यशाळा – मान. राजाबाळ पा. संगीडवार

48

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संस्काराची कार्यशाळा असून या सात दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांवर श्रम आणि सेवेचे संस्कार होत असतात ते भावी जीवनामध्ये अतिशय उपयुक्त असतात असे प्रतिपादन मान. राजाबाळपाटील संगीडवार यांनी केले ते राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते .

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने खेडी येथे महाविद्यालय स्तरित विशेष शिबिर संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. राजाबाळ पा. संगीडवार होते तर प्रमुख उपस्थिती मान. डॉ. विजय शेंडे मान.सचिन काटपल्लीवार (सरपंच ) मान.प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली प्रा. प्रशांत वासाडे, डॉ. दिलीप कामडी, डॉ. रामचंद्र वासेकर उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात डॉ. विजय शेंडे यांनी रासेयो सामाजिक नेतृत्व घडवनारा उपक्रम असून संकटसमयी रासेयो स्वंयसेवक धावून येत असतात असे विचार व्यक्त केले. मान. सचिन काटपल्लीवार यांनी आमच्या गावात शिबिराच्या माध्यमातून श्रमदान , कोरोना लसिकरन व मतदान नोंदणी सर्व्हेक्षण करुन अतिशय उपयुक्त असे काम रासेयो विद्यार्थ्यांनी केले असे विचार व्यक्त केले.

शिबिराचा अहवाल वाचन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले. शिबिराचे अनुभवकथन निराशा गुरुनुले व आशिष शामकुळे यांनी केले शिबिरात घेण्यात आलेल्या स्पर्धा व उत्कृष्ट कामगीरी केलेल्या शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सौरव गोहने यांनी केले तर आभार कु.उत्कर्षा उंदीरवाडे यांनी मानले.

कार्यक्रमाला मान. सागर येलट्टीवार खेडी येथील युवा मंडळ यांचे अमुल्य सहकार्य लाभले. महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.